इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha

इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha

श्रोतेहो नमस्कार!खास तुमच्यासाठी सूत्रधार घेऊन येत आहे, इतिहास आणि पुराणातल्या निवडक कथा. या पॉडकास्टद्वारे तुम्ही आम्ही आपण सगळेच अनेक पौराणिक कथांशी जोडले जाणार आहोत. ह्या कथा महाभारत, शिव पुराण, रामायण यांसारख्या अनेक ग्रंथांमधून आम्ही निवडल्या आहेत. दर बुधवारी तुम्ही आमचा हा पॉडकास्ट आपण ऐकू शकाल तोही तुमच्या आवडत्या ऑडियो प्लेटफार्म वर. त्याचबरोबर सूत्रधार द्वारे प्रसारित करण्यात येणारे इतर विषयांचे पॉडकास्टस सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. जसं की नल-दमयंती प्रेम कथा, मिनी टेल्स पॉडकास्ट, श्री राम कथा आणि वेद व्यासांचे महाभारत.तेव्हा भेटूया, बुधवारी आमच्या पहिल्या वहिल्या एपिसोडसह! https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar

Episodes

February 8, 2023 5 mins
गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती. एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदर फुले आणि झाडे लावलेली होती.
Mark as Played
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे.   एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडून लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृ...
Mark as Played
एके दिवश महाराज शान्तनु गंगा नदीच्या काठी विहार करत होते अणि त्यांनी पाहिले की एक किशोर वयाच्या मुलाने आपल्या धनुर्विद्येने गंगेचा प्रवाह रोखून धरला होता. महाराज शान्तनु हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचा परिचय विचारला. त्याच वेळी देवी गंगेने तेथे प्रकट होऊन शान्तनु यांना त्या मुलाचा परिचय दिला. ती म्हणाली "महाराज! आज मी तुमचा पुत्र देवव्रत तुम्हाला सोपवते आहे. याने ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांच...
Mark as Played
January 18, 2023 16 mins
द्वारकेतला पारिजात वृक्ष कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की नारदमुनींनी द्वारकेत आल्यावर एकामागोमाग एक अशा प्रकारे घटना घडवल्या, की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णानी सत्यभामेला अमरावतीहून पारिजातकाचा वृक्ष आणून तिच्या बागेत लावण्याचं वचन दिलं. श्रीकृष्णाच्या परिजात-हरण लीलेच्या या भागात आपण जाणून घेऊया की श्रीकृष्णांनी कसं आपल्या वचनाचं पालन केलं. भगवान श्रीकृष्णांचा निरोप घेऊन नारद मुनी महादेवाच्या सन्मानार्थ स्वर्गात आयोजित केलेल्या...
Mark as Played
द्वारकेत आले नारद मुनी एकदा भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी रुक्मिणी हिच्या समवेत रैवतक पर्वतावर गेले होते. तिथे देवी रुक्मिणीने एका समारोहाचं आयोजन केलं आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः अतिथींचं स्वागत सत्कार करू लागले. भगवान श्रीकृष्णांना अतिथींच्या आदरातिथ्यात काही कमी पडू द्यायचं नव्हतं. या भव्य समारंभात त्यांच्या पट्टराण्या आणि राण्यांच्या दास्यासुद्धा सहभागी झाल्या होत्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणी सोबत बसले तेव्हा तिथे नारद...
Mark as Played
द्रोणाचार्यांच्या मृत्यू पश्चात दुर्योधनाने कौरवांच्या सेनेचा सेनापती म्हणून कर्णाची नियुक्ती केली. कर्णाने दुर्योधनाला शब्द दिला की तो अर्जुनाचा वध करेल... आणि युद्धात दुर्योधनाचा विजय निश्चित करेल. आपण अर्जुनापेक्षा सर्वतोपरि कसे श्रेष्ठ आहोत हे तो दुर्योधनाला पटवून देत होता. मात्र कर्ण म्हणाला, की अर्जुनाकडे सारथ्याच्या रूपात कृष्ण आहे... मग त्याने प्रस्ताव मांडला की जर शल्य त्याचा सारथी बनला तर तो अर्जुनाच्या बरोबरीचा होईल. द...
Mark as Played
December 28, 2022 8 mins
कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकल्यानंतर, युधिष्ठिर हस्तिनापुरीचा राजा झाला आणि त्याने अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ अत्यंत संस्मर्णीय आणि व्यापक स्वरूपाचा झाला ज्याची किर्ति चारी दिशांना पसरली. यज्ञ वैदिक अनुष्ठाना नुसार विद्वान ब्राम्हणांच्या मार्गदर्शनात पार पडला आणि दानधर्मही त्याच तोडीने केला गेला जसा आजवर विश्वात कुणीही पहिला नसेल. यज्ञाच्या शेवटी एक मुंगूस तिथे आले. ज्याच्या शरीराचा अर्धा भाग सोनेरी होता आणि अर्धा तपकिर...
Mark as Played
एके दिवशी नारदमुनी मनुचा पुत्र प्रियव्रताला भेटायला गेले. प्रियव्रताने ज्ञानी ऋषी नारदांचं सन्मानानं स्वागत केलं आणि यथोचित आदरातिथ्य केलं. ज्ञान प्राप्तीच्या इच्छेपोटी त्यानं नारदमुनींना अनेक प्रश्न विचारले, पण त्याची ज्ञानर्जनाची तहान काही शमेना. त्याने नारदमुनींना प्रश्न केला"मुनिवर ! जेंव्हा काहीही घडणार असेल तेंव्हा देवांना त्याचे पूर्वानुमान असते, पण मला तुमच्याकडून अशा घटनेबद्दल जाणून घ्यायचे आहे जी अद्भुत आणि विचित्र असेल...
Mark as Played
रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकीना आद्यकवी अर्थात सगळ्यात पहिले कवी असं म्हटलं जातं. आणि त्यांनी रचलेल्या श्रीराम कथेला पहिलं महाकाव्य मानलं जातं. एकदा तिन्ही लोकी भ्रमण करणारे त्रिलोकज्ञानी देवर्षी नारद आणि तपस्वी वाल्मिकी दोघांची भेट झाली. वाल्मिकीनी नारद मुनींना विचारलं, "देवर्षी! सांप्रत काळात विश्वात गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ कृतज्ञ, सत्यवादी. धर्मानुसार आचरण करणारा, प्राणिमात्रांचं हित चिंतणारा, विद्वान, समर्थ, धैर्यवान, क...
Mark as Played
December 7, 2022 9 mins
च्यवन ऋषि 
Mark as Played
नामजपाने प्रसन्न होऊन गजाननाने आपल्या भक्ताला साक्षात आपले रूप बहाल केले त्या निस्सीम गणेश भक्ताची नामा कोळ्याची अर्थात भ्रूशुंडी ऋषींची कथा. घनदाट अशा दंडकारण्यात नामा कोळी आणि त्याचे कुटुंब राहात असे. नामा कोळी तिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटून त्यांची हत्या करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तीच त्याची दिनचर्या होती. एके दिवशी समोरून मुद्गल ऋषी हातात कुबडी आणि कमंडलू घेऊन येत होते. नामा कोळ्याने त्यांना प...
Mark as Played
गरुडाने आणलेला अमृत कलश नागांनी अमृत पिण्याआधीच इंद्र घेऊन गेला आणि नागांना अमृत मिळालंच नाही. आता ते आईच्या शापापासून आपला बचाव करण्यासाठी आणखी काही उपाय सुचतो का याचा विचार करू लागले.  या नागांपैकी शेषनागाने त्याच्या भावांच्या वागण्याने त्रस्त होऊन त्यांच्यापासून स्वतंत्र आयुष्य जगण्याचं निश्चित केलं. त्याने ब्रम्हदेवाची उपासना करण्यासाठी वर्षानुवर्ष केवळ हवा पिऊन कठोर तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन...
Mark as Played
"पक्षीराज गरूड़चा जन्म कसा झाला? तो सापांचा शत्रू आहे?" आपल्या नाग पुत्रांच्या मदतीने कद्रूने कपटाने विनता विरुद्ध पैज जिंकली आणि विनता तिची दासी बनून राहू लागली. आपल्या पहिल्या पुत्राच्या अरूणच्या शापामुळे दास्यत्वाचे जीवन जगणारी विनता त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या दुसऱ्या पुत्राच्या जन्माची प्रतीक्षा करू लागली.   योग्य वेळ येताच विनताच्या दुसऱ्या अंड्यातून महाशक्तीशाली गरूडाने जन्म घेतला. त्याची शक्ती गती दीप्ती आणि ...
Mark as Played
सूर्यदेव चा सारथी - अरुण  सत्ययुगाच्या प्रारंभात ब्रह्मदेवच्या आशीर्वादाने दक्ष प्रजापतिच्या तेरा मुलींचा विवाह प्रजापति मरीचिचा पुत्र ऋषि कश्यप यांच्याशी झाला. कश्यप ऋषि आणि त्यांच्या पत्नींपासून विश्वात अनेक प्रजाती आणि वनस्पतींची उत्पत्ति झाली. हा प्रसंग त्यांच्यातीलच दोन पत्नी कद्रू आणि विनता यांच्याशी निगडीत आहे. कद्रू च्या गर्भातून नाग तसच विनताच्या गर्भातून पक्षीराज गरुड़ आणि सूर्यदेवाचा सारथी अरुण यांचा जन्म झाला. काय आहे ह...
Mark as Played
ज्यांना दधीची ऋषीची कथा माहीत आहे त्यांना हेही माहीत असेलच की कशाप्रकारे असुर वृत्र कोणत्याही धातूच्या बनलेल्या अस्त्रापासून अवध्य होता आणि त्याचा संहार करण्यासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांचा त्याग करून आपल्या अस्थी देवराज इंद्राला दान केल्या होत्या. त्याच वृत्रासुराच्या पूर्वजन्माची ही कथा.   शूरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक राजा होता. ज्याने पूर्ण पृथ्वीवर विजय प्राप्त केला. राजाची शक्ती इतकी होती की त्याच्या राज्यात राहणार्‍य...
Mark as Played
एकदा कृष्ण आणि बलराम जंगलात काही वेळ मजेत घालवून पुन्हा ब्रिजकडे परतले. ब्रिजला पोहोचताच त्यांनी पहिलं की, इंद्रोत्सवाबद्दल सर्वच गोप खूप आनंदी आणि उत्साही आहेत. हे पाहून कृष्णाला कुतूहल वाटलं आणि त्याने विचारलं, "हा सण का साजरा करतात?"   श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून एक म्हातारा गोप म्हणाला, ''इंद्रदेव हा ढगांचा स्वामी आहे, तोच सर्व जगाचा रक्षणकर्ता आहे. त्यांच्या कृपेनेच पाऊस येतो. पावसामुळे आमची सगळी पिकं हिरवीगार राहतात, आपल्या गुर...
Mark as Played

आपल्या अहंकारामुळे अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झालेल्या नहूषाने पृथ्वीवर अनेक वर्षे एका अजगराच्या रुपात काढली. शेवटी नहुषाचा उद्धार कसा झाला हे आपण नहुषाच्या गोष्टीच्या या भागात   पाहू. 

 

एकेकाळी इंद्र असलेल्या नहुषाचे पृथ्वीवर एका सापाच्या रुपात अधःपतन झाल्याला हजारो वर्षे लोटली होती.   महर्षि अगस्त्य यांच्या शापामुळे इतक्या वर्षांच्या काळानंतरही नहुषाला हे सगळं व्यवस्थित लक्षात होतं. त्य...

Mark as Played

धन संपत्तीची देवता म्हणून सगळे कुबेराला ओळखतात. परंतु त्यांच्या पूर्वजन्माची कथा मात्र फारच थोड्या लोकांना माहित आहे. शिव पुराणातील या प्रसंगात ऐकूया, की मंदिरात चोरी करणाऱ्या चोराने अजाणतेपणाने केलेल्या कृत्यामुळे त्याला कशाप्रकारे कुबेर पद प्राप्त झालं. आणि कशाप्रकारे त्याला शंकराला प्रिय झाला. 

काम्पिल्य गावात यज्ञदत्त नावाचा एक ब्राम्हण राहत होता. त्यांना एक गुणनिधी नावाचा मुलगा होता. गुणनिधी अगदी आपल्या नावाच्या विरूध्द वागत ...

Mark as Played
October 5, 2022 14 mins
भूलोकी अनेक वर्ष धर्माने राज्य करून शौर्य आणि वैभव अर्जित केल्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे नहुष महाराजांना देवांचा राजा बनावं लागलं. पहा कसा होता देवराजा नहुषाचा कार्यकाल...      युगानुयुगे स्वर्गलोकवर राज्य केल्यानंतर इंद्रला ऐश्वर्याची चटक लागली होती आणि त्याच्या मनात या बद्दल अहंकार जागा झाला. एका काय झालं, इंद्रलोकी नेहेमी प्रमाणे उत्सवाचं वातावरण होतं. देवी शची सह आपल्या आसनावर विराजमान झालेला इंद्र नृत्य आणि गायनाचा आनंद घेत...
Mark as Played
September 21, 2022 7 mins
वैवस्वत मनूची पहिली मुलगी इला आणि चंद्रपुत्र बुध या दोघांचा पुत्र पुरूरवाने चंद्रवंशाची स्थापना केली आणि अनेक वर्ष धर्माने प्रजापालन केले. महाराज पुरुरवा आणि अप्सरा उर्वशीचा पुत्र आयूने त्यांच्या पश्चात चंद्रवंशाची धुरा सांभाळली आयू आपल्या पित्याप्रमाणेच राजधर्माचे पालन करणारा प्रतापी आणि प्रजावत्सल राजा होता. एवढं ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त करूनही आयूचं मन मात्र नेहमीच नि:संतान असल्याच्या दुःखात बुडून गेलेलं असे. त्यांच्या पश्चात चं...
Mark as Played

Popular Podcasts

    Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations.

    The Nikki Glaser Podcast

    Every week comedian and infamous roaster Nikki Glaser provides a fun, fast-paced, and brutally honest look into current pop-culture and her own personal life.

    Stuff You Should Know

    If you've ever wanted to know about champagne, satanism, the Stonewall Uprising, chaos theory, LSD, El Nino, true crime and Rosa Parks, then look no further. Josh and Chuck have you covered.

    Crime Junkie

    If you can never get enough true crime... Congratulations, you’ve found your people.

    Start Here

    A straightforward look at the day's top news in 20 minutes. Powered by ABC News. Hosted by Brad Mielke.

Advertise With Us
Music, radio and podcasts, all free. Listen online or download the iHeart App.

Connect

© 2024 iHeartMedia, Inc.