"राज"कारण " Rajkaran

"राज"कारण " Rajkaran

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट, ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

Episodes

May 3, 2024 14 mins

डोक्यावरून महिलांचा पदर ढळायला भाग नसे, त्या काळात केशरकाकू राजकारणात सक्रिय झाल्या. 

Mark as Played

गेली पाच वर्षे महाराष्ट्राने अभूतपूर्व अशा राजकीय घडामोडी, उलथापालथी अनुभवल्या आहेत.

Mark as Played

लोकप्रिय नेते सुरेशदादा जैन यांची राजकीय कारकीर्द घरकुळ घोटाळ्यामुळे संपुष्टात आली.

Mark as Played

कोरोनाशी दोन हात करतानाही पोळ्यासाठी शेतकऱ्यांनाउस बिलाचा हप्ता वेळेत देण्याची काळजी पंतांनी घेतली होती.

Mark as Played

वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन यांनी महापौरपदाला वेगळा आयाम दिला.

Mark as Played

भाजपच्या अमृत पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आपल्या वडिलांना झालेल्या त्रासाची परतफेड करण्यासाठी येवला मतदारसंघात जम बसवण्यास सुरू केली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

Mark as Played

1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती.

 

Mark as Played

संजयकाकांच्या जोडीला कोणीही बडा नेता नसताना आबाविरोधक म्हणून ते राज्यभरात चर्चेत आले. आबांच्या विरोधात मिळत असलेल्या प्रसिद्धीने संपूर्ण राज्याचं लक्ष तासगाव मतदारसंघाकडं लागलं होतं. स्वच्छ प्रतिमा असलेल्या आबांना हिसका दाखवण्यासाठी राज्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी संजयकाकांना रसद पुरवली. त्यामुळं आबा स्वतःच्या मतदारसंघात अडचणीत आले…काय घडलं होतं त्यावेळी !

Mark as Played

महाराष्ट्राच्या राजकारणात ५६ वर्षांपासून शिवसेना नावाचे वादळ नेहमीच घोंगावत राहिले. या वादळात अनेकजण तरले तर अनेकजण फसलेही पण शिवसेनेची साथ सोडून घरोबा बदलणाऱ्या भल्याभल्या नेत्यांना या वादळाने घरी बसवून चांगलीच अद्दल घडवली. 

Mark as Played

नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं….

Mark as Played

राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. इथे कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो. कोण कधी बाजू बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे उपकार, सहकार्य याला राजकारणात मोठे महत्व असते. दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत असाच एक किस्सा घडला होता. त्याची राज्यभर चर्चा झाली होती.

Mark as Played

पुण्याच्या राजकारणातील ‘भाई’ म्हणजेच सुरेश कलमाडी यांना ‘क्लीन बोल्ड’ करणारा नेता ते राजकारणात सक्रिय असेपर्यंत तरी दुसरा कुणी नव्हता. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसकडं कलमाडींशिवाय दुसरा चेहरा नव्हता. सुरेश कलमाडींची ताकत इतकी होती की त्यांच्या शब्दापलीकडे कुणीही जात नसत. शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांचा त्यांच्या समोर थरकाप उडायचा. पण भ्रष्टाचाराचे आरोप झाले अन् भाईंच्या राजकारणाला उतरती कळा लागली

Mark as Played

रिक्षा चालवताना जसे गिअर टाकावे लागतात, तसेच समाजकार्यासह राजकारणाचे पैलू अंगिकारत एक एक टप्पा पार करत एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे.

Mark as Played

बाळासाहेबांच्या विचारधारेबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र बाळासाहेबांनी सत्तेची गंगा सामान्यांच्या दारात पोहोचवली, हे कुणीही नाकारू शकत नाही. काँग्रेसच्या सरंजमी वृत्तीच्या नेत्यांसमोर सामान्यांचे काहीएक चालत नसतानाच्या काळात बाळासाहेबांनी अगदी सामान्यांतील सामान्य लोकांना सत्तेची पदं दिली. त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री बनवले

Mark as Played

देवेंद्र फडणवीस यांनी वॉर्ड अध्यक्ष ते आताचे उपमुख्यमंत्री व्हाया मुख्यमंत्री असा राजकीय प्रवासाचा टप्पा गाठला असला तरी येत्या काळात महाराष्ट्राचा हा राजकीय चाणाक्य आपल्या बुद्धीबळाने कोणाला ‘चेकमेट’ करणार, याबाबत उत्सुकता आहे

 

Mark as Played

मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार रमेश कदम यांनी मतदारसंघात केलेली कामं.......कदम यांनी निवडून आल्यानंतर विकासकामांचा धडाकाच सुरू केला होता. त्यातूनच त्यांची क्रेझ वाढली. कदमांना तुरुंगात जावं लागलं तरी त्यांची ही क्रेझ कायमच राहीली.

Mark as Played

ज्यांच्या राजकारणाचा पिंडचं सहकाराचा होता, अशी कित्येक घराणी आजही राजकारणात सक्रिय आहेत. त्यापैकीच सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचे मोहिते पाटील हे घराणं, जाणून घेऊयात इथल्या राजकारणाबद्दल

Mark as Played

एकेकाळचे कट्टर मित्र असलेले, अनेकांना जेरीस आणलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू आहेत. सतेज पाटील आणि महाडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक हे एक युद्धाप्रमाणे आहे. त्यामुळे राजकारणातून कोण संपणार, कोण तरणार हे येत्या काळात स्पष्ट दिसेल

Mark as Played

सतत धावणाऱ्या, अहोरात्र जागणाऱ्या, आणि सतत काही ना काही घडणाऱ्या मुंबईत दोन नावं घेतली, की आजही लोक क्षणभर थबकतात. जुन्या पिढीतल्या लोकांना सगळे संदर्भ आठवतात, आणि नव्या पिढीची उत्कंठा आणखी वाढत जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या दोन ध्रुवांवरच्या दोन माणसांनी त्यावेळी मुंबई व्यापली. तो काळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातही धडकी भरवणारा तुफान वादळी ठरला

Mark as Played

सध्या सगळीकडं अमूक नेत्याची ईडीकडून चौकशी झाली....तमूक नेता ईडी कार्यालयात हजर झाला. यांची चौकशी होणार, त्यांच्यावर ईडीने कारवाई केली, असे अनेक शब्द नेहमीच ऐकावयास मिळतात. त्यामुळे नेमकी ईडी म्हणजे काय?, त्याचे कार्य कसे चालते, या बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

Mark as Played

Popular Podcasts

    Current and classic episodes, featuring compelling true-crime mysteries, powerful documentaries and in-depth investigations.

    Death, Sex & Money

    Anna Sale explores the big questions and hard choices that are often left out of polite conversation.

    Stuff You Should Know

    If you've ever wanted to know about champagne, satanism, the Stonewall Uprising, chaos theory, LSD, El Nino, true crime and Rosa Parks, then look no further. Josh and Chuck have you covered.

    Crime Junkie

    If you can never get enough true crime... Congratulations, you’ve found your people.

    Start Here

    A straightforward look at the day's top news in 20 minutes. Powered by ABC News. Hosted by Brad Mielke.

Advertise With Us
Music, radio and podcasts, all free. Listen online or download the iHeart App.

Connect

© 2024 iHeartMedia, Inc.